Your Dream House
We are Stargaze Architecture Agency











ट्रस्ट विषयी माहिती
महाराष्ट्रातील दाभोळी गवळी ज्ञातीची शिखर संस्था असलेल्या आपल्या महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टची स्थापना दिनांक १७ फेब्रुवारी १९४६ रोजी ट्रस्टचे पहिले अध्यक्ष व संस्थापक विश्वस्त कै. माधवराव भागोजी कोटकर यांच्या आत्माराम बिल्डिंग, जगन्नाथ शंकरशेट मार्ग, गिरगाव मुंबई येथील निवासस्थानी झाली.
ट्रस्टच्या स्थापनेपूर्वी ज्ञातीच्या मुंबईत ‘यादव संघटन समिती’ व सन १९२० साली स्थापन झालेली ‘यादव गोपाळ मंडळ’ या दोन संस्था कार्यरत होत्या. ट्रस्टच्या स्थापनेसाठी मुंबईतील गिरगाव व नायगाव भागातील समाजबांधवांनी एकत्रित प्रयत्न केले.
महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचा विस्तार
संस्थेच्या महाराष्ट्रामध्ये एकूण २५ शाखा आहेत. संस्थेची ध्येये व उद्दीष्टे समाजबांधवांपर्यंत पोहोचवून संस्थेच्या समाजकार्यामध्ये सर्वांना सहभागी करून घेणे, समाज बांधवांमधील शैक्षणिक व सामाजिक पातळी उंचावण्याकरिता संस्थेने आपल्या शाखांचा विस्तार केला आहे.

विद्यमान विश्वस्त मंडळ

















सभासदांना सूचना / ठळक बातम्या
दिनांक 2024-02-15
महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचा ७७ वा वार्षिक अहवाल सन एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ ऑनलाईन वेबसाईट द्वारे जाहीर केला गेला.
अहवालाची लिंक: Click Here
दिनांक 2019-10-11
श्रीकृष्ण मंदिर सभागृह, पहिला माळा : हे सभागृह पूर्णपणे वातानुकूलित करून त्याचे उदघाटन ट्रस्टचे अध्यक्ष मा. श्री. प्रदीप रा. धुमाळ ह्यांच्या शुभहस्ते दिनांक ८ मे २०१९ रोजी अक्षय तृतियेच्या शुभमुहूर्तावर करून ट्रस्ट तर्फे होणाऱ्या सामूहिक विवाहाला या वातानुकूलित सभागृहात प्रथम प्राधान्य देण्यात आले.
दिनांक 2019-09-24
सभासद रेकॉर्डिंग सिस्टिम (Members Recording System):संस्थेचे अत्यंत महत्वाचे रेकॉर्ड कॉम्पुटर प्रोग्रॅमद्वारे अपडेट करून या सिस्टमचे उदघाटनही अक्षयतृतियेच्या मुहूर्तावर ८ मे २०१९ रोजी ट्रस्टचे अध्यक्ष मा. श्री. प्रदीप रा. धुमाळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
दिनांक 2021-10-09
वाढदिवस शुभेच्छा :महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट चे माजी अध्यक्ष आणि विद्यमान विश्वस्त मा. श्री. प्रदीप धुमाळ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
सभासद नोंदणी विषयी
- सभासद नोंदणीचा अर्ज भरून मुख्य कार्यालयात देणे अथवा शाखा कार्यालयात देणे.
- संस्थेचा सभासद हा आजीव सभासद असेल व या सभासदाकडून फक्त एकदाच र १०१/- सभासद वर्गणी घेण्यात येईल.
- सभासदाची नोंद फक्त मुख्य कार्यालय अथवा सभासद होणाऱ्या व्यक्तीच्या शाखेमध्येच केली जाईल.
- सभासद झाल्याची पावती घेणे आवश्यक आहे
- सभासदाचा पत्ता बदलल्यास तो त्वरित मुख्य कार्यालयात कळवणे, तसेच मुख्य कार्यालयात आपल्या भ्रमणध्वनीची नोंद करून घेणे.
- ज्या सभासदांनी आपली निवासस्थाने बदलली असतील अशांनी संबंधित कार्यालयात नवीन पत्ते बदलून घेणे.
- संस्थेचे जे सभासद स्वर्गवासी झाले आहेत, अशांच्या वारसांनी अगर जवळच्या नातेवाईकांनी ट्रस्ट कार्यालयात लेखी कळवावे
- समाजातील ज्या विद्यार्थ्यांनी संस्थेमधून शिक्षणाकरिता परत फेडीच्या तत्वावर – शैक्षणिक फी घेऊन शिक्षण पूर्ण केले आहे व ज्यांची उपजीविका चालू आहे अशा समाज बांधवांनी फी ची रक्कम संस्थेच्या मुख्यकार्यालयामध्ये परत करावी, जेणे करून इतर समाज बांधवांना त्याचा लाभ होईल.