



बँक्वेट हॉल माहिती
- बँक्वेट हॉल -
पहिल्या माळ्यावरील सभागृहाचे रूपांतर बँक्वेट हॉल मध्ये करण्यात आलेले असून हे सभागृह पूर्णपणे वातानुकूलित आहे. २५० खुर्च्या, भव्य सुशोभित स्टेज, वधूवरासाठी प्रत्येकी एक वातानुकूलित खोली, भोजन व्यवस्थेची सोय, थंड पाण्याकरिता स्वतंत्र कूलरची व्यवस्था अशा सुखसोयीनीं परिपूर्ण असा आमचा बँक्वेट हॉल (पहिल्या माळ्यावरील सभागृह) उपलब्ध आहे.
तळ मजल्यावरील प्रशस्त सभागृह ३५० खुर्च्यांसह, भव्य सुशोभित स्टेज, वधूवरांकरिता वातानुकूलित खोल्या, भोजनाकरिता स्वतंत्र जागा उपलब्ध. हे सभागृह वातानुकूलित नसले तरी हवेकरीता उत्तम पंख्यांची व्यवस्था, अशा सर्व सुविधांनी परिपूर्ण सभागृह म्हणजेच श्रीकृष्ण मंदिर सभागृह. या सभागृहाकरिता संस्थेच्या कार्यालयात ०२२-२४१६९०४७ या दूरध्वनीद्वारे संपर्क साधू शकता.
- बँक्वेट हॉल -
छोट्या सभा, वाढदिवस, साखरपुडा सारख्या कार्यक्रमांना ५० – ६० खुर्च्यांसह हे सभागृह उपलब्ध आहे.

वरील कोणतेही सभागृह आरक्षित करण्याकरिता येथील चौकशी बटणावर क्लिक करून योग्य ती माहिती भरा जेणेकरून आमच्या कार्यालयातील व्यवस्थापक आपणास संपर्क करतील अथवा आमच्या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक ०२२-२४१६९०४७ वर व्यवस्थापकांशी संपर्क साधावा.