“
which fill place. Land she’d subdue divided gathering blessed
seasons it. Without, wherein days.
Jimmie Benedict
MARKETING
About US
Homeकै. माधवराव भागोजी कोटकर
संस्थापक विश्वस्तांचा अल्पपरिचय
कै. माधवराव भागोजी कोटकर
कै. माधवराव भागोजी उर्फ बाबासाहेब कोटकर यांचा जन्म १२ मे १८९४ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर या गावी झाला. पेंटिंगच्या धंद्यातील साईनबोर्ड पेंटर्स म्हणजेच एम. बी. कोटकर ब्रदर्स पेंटर्स म्हणण्याइतके अतुलनीय यश, स्वतःच्या कर्तबगारीवर एनॅमल वर्क्स सारख्या राष्ट्राचे गरज भागविणाऱ्या १००-१२५ माणसे काम करणाऱ्या कारखान्याची स्थापना, इतर समाजातील संस्थांना मुक्तहस्ताने केलेली मदत, खंडाळा येथे मध्यमवर्गीयांसाठी बांधलेले सॅनेटोरियम मुंबईच्या परिसरात छोट्या उदयॊगधंद्यासाठी जागेच्या अभावी होणारी कुचंबना निवारण्यासाठी गोरेगाव येथे बांधलेली कोटकर औद्योगिक वसाहत, अशा ह्या व इतर काही गोष्टी की ज्या त्यांनी मुंबईत राजापूरसारख्या लहानशा गावातून वयाच्या १४ व्या वर्षी येऊन इतर कोणाचाही आधार न घेता केवळ स्वतःच्या असामान्य कर्तृत्वाने खुलवून करून दाखविल्या हे सारे त्यांच्या उज्वल कामगिरीचे द्योतक आहे.
आपल्या आयुष्यात एका पेंटिंगच्या दुकानात अवघ्या आठ रुपये पगारावर साधा नोकर राहण्यापासून तो हाताखाली १००-१२५ नोकर ठेवण्याइतकी त्यांनी प्रगती केली. त्यांची राहणी साधी, निर्व्यसनीपणा, परोपकारी स्वभाव व विनोदी वृत्तीचे होते. १८ एप्रिल १९२० साली स्थापन झालेल्या यादव गोपाळ मंडळाद्वारे त्यांनी सोमवंशीय क्षत्रिय यादव समाजाची शैक्षणिक व सामाजिक उन्नती करण्यासाठी परिश्रम घेतले. आपल्या दातृत्वाने या संस्थेतर्फे होणाऱ्या सभा, संमेलनाला व शिक्षण फंडाला सक्रिय साहाय्य केले.
१६ मे १९५४ साली त्यांच्या वयाला ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा षष्ठंब्दीपूर्ती निमित्त सत्कार समारंभ खंडाळा येथे मुंबईचे महसूल व शेतकीमंत्री कै. भाऊसाहेब हिरे यांच्या अध्यक्षतेखाली झाला व आपल्या यादव समाजाने मुंबई प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष श्री. स. का. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली केला.
१७ फेब्रुवारी १९४६ साली आपल्या महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टची स्थापना कै. कोतकर बंधूंच्या घरात झाली. ट्रस्टच्या निधीसाठी पुणे, खेड, चिपळूण वगैरे ज्या ज्या ठिकाणी आपला समाज आहे, त्या ठिकाणी दौरे काढून ट्रस्टचा प्रचार करून निधी जमविला. स्वतःची एकवीस हजाराची आश्वासित रक्कम दिल्यानंतर दहा हजार रुपयाचे कर्ज ट्रस्टला दिले.शिवाय इतर जाती बंधूंकडूनही त्यांनी निधी जमविला. ट्रस्टच्या इमारतीची बांधकामाच्या सुरुवातीपासून त्यांनी बरेच परिश्रम घेऊन ती इमारत पूर्ण करून आपल्या समाजाची सेवा केली. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, रत्नागिरी गोगटे कॉलेज, जैतापूर हायस्कूल वगैरे इतर संस्थांनाही त्यांनी उदार देणग्या दिल्या आहेत. त्यांना क्रिकेट, नाटक व संगीत याविषयी फार प्रेम होते. ट्रस्टच्या स्थापनेपासून १९५० पर्यंत व पुन्हा १९५७ पासून १९६० पर्यंत ट्रस्टचे अध्यक्ष होते. कै. माधवराव भागोजी कोटकर ट्रस्टचे कार्य करीत असतानाच वयाच्या ६९ व्य वर्षी २३ डिसेंबर १९६३ रोजी मृत्यू पावले.
