Lesser replenish bearing they’re him cattle kind dominion. You
which fill place. Land she’d subdue divided gathering blessed
seasons it. Without, wherein days.

Jimmie Benedict

MARKETING

About US

Homeकै. शांताराम शामराव घोले

संस्थापक विश्वस्तांचा अल्पपरिचय

कै. शांताराम शामराव घोले

कै. शांताराम शामराव घोले यांनी विद्यार्थी दशेत महाराष्ट्र एजुकेशन सोसायटीच्या हायस्कूलच्या सिनियर क्रिकेट टीममध्ये असताना त्यांनी सतत दोन वर्ष खेळून शाळेस शील्ड मिळवून दिले. नुतन मराठी विद्यालयात असताना शरीरसौष्ठव आणि वेटलिफ्टिंगमध्ये पहिल्या प्रतीची बक्षिसे मिळविली. तसेच कुस्तीत चॅम्पिअनशीप मिळविली. त्यांनी व्यायाम प्रसारार्थ सन १९३५ मध्ये बलभीम क्लब (आखाडा) या व्यायाम संस्थेची स्थापना केली.

कै. रावबहादूर डॉ. विश्राम रामजी घोले हे त्यांचे आजोबा. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून व जनसेवा करण्याच्या उद्देशाने ते सॅन १९३५ मध्ये पुणे नगरपालिकेत प्रथम निवडून आले. तेव्हा पासून निरनिराळ्या समित्यांचे ते अध्यक्ष व सभासद म्हणून त्यांनी अनेक सार्वजनिक लोकोपयोगी कामे केली. सॅन १९३७ मध्ये स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी काम केले व विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे सॅन १९४५-४६ शाळांसाठी पुणे नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली.

महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या स्थापनेसाठी त्यांनी बरेच श्रम घेतले. ट्रस्टच्या स्थापनेपासून सॅन १९५० पर्यंत उपाध्यक्ष व नंतर १ नोव्हेंबर १९६० पासून १९६३ पर्यंत ते अध्यक्ष होते. त्यांचे दुःखद निधन ११ डिसेंबर १९६३ रोजी पाटस येथे झाले.