Lesser replenish bearing they’re him cattle kind dominion. You
which fill place. Land she’d subdue divided gathering blessed
seasons it. Without, wherein days.

Jimmie Benedict

MARKETING

About US

Homeकै. सदाशिव रामचंद्र भालेकर

संस्थापक विश्वस्तांचा अल्पपरिचय

कै. सदाशिव रामचंद्र भालेकर

कै. सदाशिव रामचंद्र भालेकर मूळचे गुहागर तालुक्यातील अडूर या गावचे. १९२१ साली वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी मुंबईत येऊन एका संगीत शाळेत एक साधा नोकर म्हणून नोकरी केली असे सांगितले तर आपल्याला आश्चर्याचा धक्का बसेल. गायन शाळेतील पेट्या इकडे तिकडे उचलणारा एक अल्पशिक्षित मामुली नोकर ते ट्रस्टला रुपये सोळा हजार देणगी ट्रस्टचे अध्यक्ष हे अंतर खूप मोठे आहे. सर्व सामान्य माणूस ते तोडू शकत नाही. परंतु कै. स. रा. भालेकरांनी आपल्या अंगाच्या चिकाटीने, उत्तम शीलतेने व बुद्धिमत्तेने ते गाठले होते. अर्थात त्यासाठी त्यांना फार मोठा लढा बिकट परिस्थितीत द्यावा लागला. रात्रीच्या शाळेत इंग्रजीचे शिक्षण घेऊन ते नंतर एका वकिलाकडे राहिले. त्यासाठी त्यांना कायद्याचे पुष्कळ ज्ञान मिळाले व त्यांच्या धडाडीच्या वृत्तीला नवे अंकुर फुटून ते लोकांना कायदाच सल्ला देण्याचे काम स्वतंत्रपणे करू लागले. उपहारगृहे, पानाच्या गाद्या, बांधकामाची कंत्राटे असा त्यांचा व्याप जसजसा वाढत गेला तसतशी सामाजिक कार्य करण्याची इच्छाही वाढत गेली.

आपल्या समाजासाठी एक ट्रस्ट उभारण्याच्या त्यांच्या कल्पनेला मूर्त स्वरूपात आणण्यासाठी त्यांनी आपले तन-मन-धन अर्पण केले. एवढेच नव्हे तर त्यासाठी आपल्या समाजातील मातब्बर व्यक्तींनाही ट्रस्टच्या उपयुक्त कार्यात कार्य करावयास लावले. ट्रस्ट प्रमाणे यादव गोपाळ मंडळ, यादव युवक मंडळ यांना वेगवेगळी मदत केली. आपल्या जन्म गावाजवळील नागझरी या गावाला शाळा बांधून दिली. स्वतः ते गरीब कुटुंबात जन्माला आल्यामुळे त्यांना गरिबांच्या अडचणींची कल्पना होती. ट्र्स्टडीडचे लिखाण सुसूत्रबद्ध कारण्यामागचे त्यांचा महत्वाचा भाग होता. कै. स, रा. भालेकर १ जानेवारी १९५० पासून १९५७ पर्यंत ट्रस्टचे अध्यक्ष व १ नोव्हेंबर १९६० पासून वर्ष संपेपर्यंत उपाध्यक्षपद घेतल्यानंतर पुन्हा १९६४ पासून मृत्यूच्या शेवटच्या घटकेपर्यंत म्हणजे नोव्हेंबर १९६७ पर्यंत कार्यकारी मंडळाच्या शेवटच्या सभेला उपस्थित राहून त्यांनी मार्गदर्शन केले. कै. सदाशिव रा. भालेकर यांचे अल्पकाळाच्या आजाराने १४ डिसेंबर १९६७ रोजी वयाच्या ६२ व्य वर्षी निधन झाले.