“
which fill place. Land she’d subdue divided gathering blessed
seasons it. Without, wherein days.
Jimmie Benedict
MARKETING
About US
Homeकै. सखाराम कृष्णाजी कांबळे
संस्थापक विश्वस्तांचा अल्पपरिचय
कै. शांताराम शामराव घोले
कै. सखाराम कृष्णाजी कांबळे हे सर्वांना “दादा कांबळे” या नावाने सुपरिचित होते. दादांचा जन्म कुलाबा जिल्ह्यातील गोंडाळ या गांवी १५ जून १८८७ रोजी झाला. पण त्यांचे लहानपण व शिक्षण सौराष्ट्रात दोरजी या गावी झाले. ७ व्या इयत्तेपर्यंत दादांचे शिक्षण झाले. लहानपणची परिस्थिती चांगली नव्हती, म्हणून वयाच्या १६ व्या वर्षी मुंबईला आपल्या आत्याकडे आले व कापड दुकानात १० वर्षे नोकरी केली व नंतर त्याच मालकाच्या मिठाईच्या दुकानात १८ वर्षे नोकरी केल्यावर स्वतःचे दुकान सुरु केले. पण दिड वर्षातच त्यांना ते दुकान बंद करावे लागले. नंतर अल्पकाळ मुंबईत, तसेच कराचीला तुपाची, तशीच चुण्या विटांची वखार काढली. पण महत्वाचा धंदा म्हणजे १९४४ च्या सुमारास बुलियन एक्सचेंगमध्ये भागीदारीत काढलेली सोन्याचांदीची पेढी सुमारे १० वर्षे चालविली. सत्यनिष्ठा, व प्रामाणिकपणा या गुणांमुळेच त्यांना समव्यावसायिकात मोठा मान मिळालेला होता व त्यांच्या शब्दाला मोल होते.
आपल्या समाजातील अनेक संस्थांना त्यांनी मदत केलेली आहेच परंतु मराठा मंदिर, शिवाजीसमरक मंदिर वगैरे संस्थांना देणग्या दिलेल्या आहेत. पूर्वी हिंदू मुसलमानांच्या दंग्यातही जखमी झालेला मग तो कोणीही हिंदू असो, त्याला आपल्या घरी निवारा देऊन प्रथमोपचार करून रुग्णालयात पोहोचविण्याचे काम केले आहे. ते राहतात त्या कुंभारवाडा, गोल देऊळ परिसरात लहानापासून थोरांपर्यंत, गरिबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वजण त्यांना ओळखतात व त्यांच्याबद्दल आदर दाखवून श्रीसत्यनारायण पूजा, गोकुळाष्टमी उत्सव यांचे प्रमुखत्व त्यांना देत असत. ते वृत्तीने रसिक होते. त्यांना नृत्य, संगीत, नाटक आदी कलांची आवड होती. त्यांनी अनेक गरीब कलावंतांना आश्रय दिला आहे.
दादांचे व्यक्तिमत्व मोठे मोहक होते. त्यांचे बहुसंख्य मित्र गुजराथी असल्यामुळे, लहानपण गुजराती समाजात गेल्यामुळे त्यांच्या स्वभावात गुजराती समाजाची विनयशीलता व मराठ्यांचा कणखरपणा आलेला होता, त्यांनी केलेल्या व्यवसायातून चांगला पैसा मिळविला. परंतु त्यांच्या उदार स्वभावामुळे ते संचय करू शकले नाही. आपल्या पैशाचा अनेकांना त्यांच्या अडचणीत त्यांचा उपयोग झाला याचा त्यांना आनंद वाटायचा. १९५० पासून १९६७ पर्यंत ते ट्रस्टचे उपाध्यक्ष होते व तद्नंतर १ मे १९७२ पर्यंत अध्यक्ष होते. त्यांचे दुःखद निधन २ जानेवारी २ जानेवारी १९७८ रोजी झाले.
